आज काल मन माझं जरा दुखीच असतं,
चीमुल्क्ल्यांच्या आठवणींनी व्याकुळ असत.
ठेवली नव्हती भाकर अल्लाह नि देशात माझ्या,
म्हणून मित्रांनो आजकाल मी सौदीत असतो.
यंदा सुट्टीत 'अब्बा' सारखं जवळ बसवत होते.
आजकाल तब्बेत बरी नसते अस म्हणत होते.
काही सांगायचा होत त्यांना, हिम्मत केली नाही
'बहुला' विचारले देशात बर्याच नोकऱ्या आहेत नाही?
आज काय जेवलास अस आता 'अम्मी' विचारत नाही.
कारण प्रत्तेक वेळेस मी "बिर्याणी" सांगू शकत नाही.
खरं ऐकायची तिच्यात हिम्मत नाही.
अज्ञानातच खर सुख असतं, जीवन असंच कटत असतं.
बंगला, गाडी, स्टेटस खरच का एवढ महत्वाचं असतं.
काळजाच्या अकांताचे देखील त्याला भान नसतं.
माणूस रोज रोज मरून जगत असतो.
हे अल्लाह! तू आम्हाला जीवन दिलेस, तूच आम्हाला शक्ती दे.
जहीर सय्यद
Humkalaam
इतर चांगल्या लेखकांचे ब्लॉग्स पाहून मला सुद्धा उर्मी आली आपण हि करून पाहायला काय हरकत आहे म्हणून केले ला हा "प्रयोग"
बुधवार 1 सप्टेंबर 2010
प्रार्थना
मंगळवार 31 ऑगस्ट 2010
आमचा 'ऐतिहासिक' प्रवास:
माझी घाल मोल पाहून आमचे सिनियर सहकारी "अश्फ़ाक़ भाईंनी" मला हिम्मत दिली व त्यांनी अखेर मला तयार केलं. तसेच त्यांनी फोन वर बोलून माझी तेथील सर्व व्यवस्था पक्की केली. मी सुद्धा मनाचा पक्का हिय्या केला आता काहीही होवो मी जाणारच. फक्त आता गरज होती आमच्या सौ च्या होकाराची. सकाळी ११:३० ला मी सौ ला फोन वर विचारले असता तिनेही आनंदाने होकार भरला. व मी १:३० ला मनेजर ची परवानगी घेवून ऑफिस बाहेर पडलो. घरी येवून जेवण केले आणि वाटलं थोडा आराम करावा कारण आता पुढचे ५ दिवस अजिबात आराम नव्हाता.
तशी आमची गाडी ची वेळ संध्याकाळी ७ ची ठरली होती परंतु ३:३० मित्राचा फोन आला तयार राहा काधिहि निघावे लागेल. आम्ही लगबगीने तयारीला लागलो. आता काय काय घ्यावे काय नको दोन लहान मुलं घेवून हा प्रवास करणे तितकंसं सोपं नव्हतं. परंतु या गोष्टीची आयडिया तिला नव्हती. आणि मीही तिला अज्ञानात सुखी ठेवुइछित होतो. शेवटी ५ ला मित्राचा फोन आला लवकर निघा गाडी तयार आहे.
घराला कुलूप लावताना मनात विचार आला हेच जर मी इंडिया मधून निघत असतो तर...
महिना भर अगोदर लोकांचे जेवणाचे आमंत्रण (हे आमंत्रण/निमंत्रण मधील घोळ अजून हि डोक्यात्ना जात नाही) जवळ च्या नातेवाइका कडून कपडे, फुलहार,सत्कार इत्यादी इत्यादी. परत मुंबई एयर पोर्ट वर सोडायला २/४ गाड्या भरून माणसं. पण इथ अवस्था अशी होती हज ला चाललोय असे आई वडलांना फोन करून सांगितल्या नंतर अजून कोणाला सांगायची सोयच नाही. शेवटी ट्याक्सी वाल्यालाच सांगितले. तो केरळी होतां (एक तर हे लोक हिंदीत किंवा उर्दू म्हणा, बोलायला तयार नसतात) . "भाई हम हज करने को जारहे है" त्याने हि आपली त्रासिक मुद्रा मुश्किलीने हलवायची तकलीफ घेतली. आणि मी त्यावरच समाधान मानून घेतले.
मी इंडिया हून सुट्टी संपवून सौदी ला येई पर्यंत हज चा फॉर्म भरायची तारीख निघून गेली होती. त्यामुळे आम्हाला हि आड मार्गाची कसरत करावी लागत होती. सुरवातीला त्या सौदी ट्याक्सी वाल्याने जो आम्हाला हज साठी "मक्का" मध्ये सोडण्याचे दिव्या पार पाडणार होतां "जद्दा" ते "मक्का" १५० रियाल प्रत्तेकी ठरवलं होत. मी आमच्या सौ आणि २ अपत्य व एक मित्र असे ६०० रियाल होत होते म्हणजेच अंदाजे ७,५०० इंडिअन रुपये होतात. माझ्या घरापासून ९५ किलो मीटर जाण्या साठी. काय करणार सिझन होताना हज चा. आणि निघता निघता ६ वाजून गेले होते. निघण्या आधी तो सौदी ड्रायवर म्हणाला चेक पोईंट मुळे २/३ किलोमीटर पायी चालावे लागेल. आमच्या मनाची तयारी होतीच. तशी कल्पना मी सौंना दिलेली होती.
"जद्दा" सोडल्या नंतर ३५ किलोमीटर वर चेक पोईंट होतं आम्ही गाडीतून उतरलो. दोन बॅगा दोन अपत्य आणि सौ ला देखील सांभाळत आमचा काफेला निघाला. थोडं हाय वे वर चालल्यावर आम्हाला आत घुसाव लागलं अर्थातच वाळवांटात जिथं चालनही मुश्कील असतं वाळू मुळे. परत थोडं चाल्यावर वर मोठा टेकडा आला. हे सर्व घेवून चढायचं तेही रात्रीच्या वेळी अंधार, परदेशात, अनोळखी ठिकाणी म्हणजे थरारक काम होत ते. परंतु अधून मधून आमच्या सारखे काही लोक हि होते त्यांच्या मुळे थोडं धीर आला होतां. मोठ्या मुश्किलीने ड्रायवर ने सांगितल्या प्रमाणे चालत गेलो आता जिथून हाय वे ला लागायचा होत तिथे परत एक चेक पोईंट दिसायला लागलं आणि आमच्या मनात धडकी भरली. माझ्या मित्राने ड्रायवर ला फोन लावला आणि तो म्हणाला अजून एक चेक पोईंट अचानक लागल्या मुळे तुम्हाला परत वाळवांटात घुसून ३/४ किमी चालव लागेल दुसरा पर्याय नाही. हे ऐकताच माझ्या पाया खालची जमीन (जमीन काय वाळू म्हणावी लागेल) सरकली.
माझा मित्र "अतिक" ने "सारा" ला कडेवर घेतलं माझ्या दोन्ही खांद्यावर दोन ब्यागा एका हातात सौ ची बॅग व एका हाताने सौ ला सांभाळत आणि "उम्मे हानी" हाताला धरून अश्या पद्धतीने परत आमची पायपीट सुरु झाली. मधूनच टेकड्या लागायचे. कधी वाळू कधी ओबड धोबड खडकाळ जमीन. त्यातच सौ ची चप्पल ने जीव सोडला. (उंच टाचेच्या चपला बायकांनी घालूच नये अश्या मताचा मी पहिल्या पासून आहे...... पण आता जाऊद्या, नंतर बोलू) काटे कुटे काचा मधूनच मेलेल्या उंटाचे भले मोठ मोठाले हाड त्यावर मोबाईल चा प्रकाश पडल्यावर फार भयानक वाटायचं ते. कधी थोडं बसायचं मग परत चालायला लागायचं, असं वाटत होत कधी संपेल हा प्रवास. अचानक हाय वे दिसायला लागलं जीवात जीव आला. थोडे पुढे गेल्यावर आम्ही हाय वे ला लागलो आता तो क्रॉस करणे एक खूप अवघड काम होते. कारण आपण दोन/चार पदरी पर्यंत पहिले होते परंतु एवढे रुंद रस्ते (कि रस्त्याचा मैदान) आणि त्यावरून वार्याच्या वेगाने जाणार्या गाड्या ओलांडणे तेही बायको मुलां बरोबर...कठीण काम आहे. बराच वेळ आम्ही कडेला थांबलो तेवढ्यात एक पोलीस ची गाडी आमच्या जवळ थांबली. त्यांनी आमची विचार पूस केली आणि एक पोलीस स्वतः आमच्या बरोबर येवून अगदी १८०/२०० च्या स्पीड ने येणाऱ्या गाड्यांना थांबवत त्याने आम्हाला रस्ता ओलांडून दिला.
शेवटी आम्ही त्या पेट्रोल पंपावर पोहोचलो जिथे तो ट्याक्सी वाला आमची वाट पाहत उभा होतां. आम्ही ३ तासात जवळ जवळ ७ किमी चे अंतर पार केले होते. मग उरलेला प्रवास "मक्का" शहर पर्यंतचा होतां. आमच्या "टूर" च्या हॉटेल पर्यंत पोहोचायला आम्हाला जवळ जवळ पहाटचे ४ वाजले होते. आमच्या पोहोचण्या आधी बस भरून गेली होती. मग मनेजर म्हणाला आपण थकून गेला आसाल थोडं आराम करा मी तुमची दुसर्या बस मध्ये वेवस्था करतो. आम्ही जवळच असलेल्या रेसटोरंट मधून "शावार्मे" आणून खाल्ले आणि मुले झोपून गेली होती थोड्या वेळात बस आली व आम्ही "मीना" साठी प्रस्थान केले......

लेबले:
आमचा 'ऐतिहासिक' प्रवास:
रविवार 29 ऑगस्ट 2010
माझे काका आणि बैल
कधी कधी माणूस उस्फूर्त पने एखादे सामान्य कार्य करून जातो परंतु नंतर विचार केल्यावर तो खूप विचित्र वाटते. असेच एकदा मी माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला नाशिकला गेलो होतो. भरपूर वेळ असल्यामुळे मी चार पाच दिवस आधी गेलो होतो. तेवढाच लग्नाच्या घरात कामालाही मदत होईल म्हणून.
एक दिवस मी काका काकू बरोबर बाजारात गेलो. भाजी बाजार होता तो. मी आपल्या पिशव्या घेवून मागे मागे चालत होतो. अचानक मागून आरडा ओरडा सुरु झाला. मी घाबरून मागे वळून पहिले एक भला मोठा बैल भर बाजारात घुसला होता. आणि आता तो आमच्याच दिशेने येत होता. मी आपला एक कोपरा शोधून दबकून अंग चोरून पिशव्यांची ढाल करून उभा राहिलो. ह्या अपेक्षेने कि बैल आपला सरळच जाईल. नाहीतरी माझ्या माहिती प्रमाणे बैल लोक हे अगदी नका समोर सरळ चालत असतात. त्यानंतर माझे काका गर्दी मध्ये स्वतःला सावरत बाजूला झाले. मग तो बैल निघाला आमच्या काकुच्या दिशेने. काकुच्याही हातात पिशव्या वगैरे होत्या. त्यांची घाबर गुंडी उडाली. त्यांना ऐन वेळेस लपायला कोठेच जागा सापडेना त्यांनी आरडा ओरड सुरु आणि हे दृश्य पाहून माझ्या काका मधील "धर्मेंद्र" जागा झाला. आता काकू पुढे त्यांच्या मागे बैल आणि बैलाच्या मागे काका असं भयानक दृश्य पाहून मी सुद्धा हातातील पिशव्या वगैरे फेकून दिल्या आणि माझ्या अंगात सलमान खान आणण्याचा बराच प्रयत्न केला परंतु अडचण अशी होतीकी अंगात सलमान आणायचा म्हणजे शर्ट चे बटन काढायला वेळ हवाना तेवढा. ह्या अश्या आणीबाणीच्या परिस्थितीत तेवढा वेळ कुणाकडे? त्यामुळे तो बेत रद्द करावा लागला.
मग बघता बघता माझे काका बैलाच्या पुढे गेले तो पर्यंत काकू सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबल्या होत्या परंतु आता खूप उशीर झाला होता म्हणजे माझे काकांनी बैलाच्या समोर येवून दोन्ही हाताने त्याची शिंगे पकडली होती. अश्या पद्धतीने ते अभिमन्यू प्रमाणे चक्रव्ह्युव मध्ये अडकले होते कारण एकदा बैला चे शिंग पकडले म्हणजे आता परिस्थिती अशी झाली कि शिंगे सोडली तर तो बैल शिंगे मारणार आणि नाही सोडली तर त्या बैलाच्या शक्ती समोर आमच्या काका ची काय बिसात तो त्यांना अगदी सहज पने फरफटत न्हेत होता. अरेबापरे मी म्हणालो अरे आता हा तर दुसरा खेळ सुरु झाला. मला काका वरच राग यायला लागला होता. कारण माझ्या मते त्यांनी काकूला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा डायरेक्ट बैलाशीच पंगा घेतला होता. "मी म्हणतो काय गरज होती", असं विचारवं जाऊन त्यांना. पण मी म्हटलो आत्ताच नको कारण आता ते "बिझी" आहेत.
शेवटी त्यांनी चलाखी दाखवली (म्हणजे काय? दुसरा पर्यायाच नव्हता, दाखवावीच लागली ) आता भाजी बाजारात दोन दोन फुटाच्या उंचीचे ओटे बनलेले असतात आणि दोन ओट्या मध्ये काही अंतर असतो. अशे दोन चार ओटे त्यांनी बैला बरोबर फुकटात पार केले होते (कारण आमच्या गल्लीत उंटा वाला येतोना मुलांना चाकर मारायला तो साला पैशे घेतो) त्यांनी आजूबाजू चे अवलोकन केले आणि अश्याच दोन ओट्या मधल्या मोकळ्या जागेत आल्यानंतर त्यांनी अत्यंत चलाखीने स्वतःला बाजूला झोकून दिले. आणि अश्या पद्धतीने या दोन्ही खेळावर पडदा पडला. आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
परंतु या गोष्टीचा मी भलताच धसका घेतलाय. त्या मुळे त्याचा माझ्यावर वाईट परिणाम झालाय. होत काय कि आता जेंव्हा कधी मी माझे ते काका आणि बैल एकत्र पहातोना तर मी मूर्च्छा येवून पडतो. बरं गोष्ट इथे संपत नाही कारण एकदा मी असेच दुसर्या (त्यांच्या पेक्षा मोठे) काकांच्या घरी गेलो होतो. काका काकू माझी चुलत भाऊ बहिणी आम्ही सर्व जन गप्पा मारत बसलो होतो. सहज विषय निघाला आणि ह्या गोष्टीची आठवण निघाली तर मी सविस्तर पने हि कहाणी सांगत होतो सगळे पोट धरून हसत होते परंतु माझ्या लक्षात आले कि माझे काका थोडे गंभीर झाले होते, मी म्हटलो अरे बापरे यांनी मनावर घेतला कि काय? त्यांच्या भावावर सार्वजन असे हसतायत म्हणून. सर्वजन त्यांना पाहू लागले. थोडा अवकाश घेवून त्यांनी तोंड उघडले. ते म्हणाले "अरे तो होत म्हणून असे घडले, त्याला काय जमतंय? मी असतोना ....तर त्या बैलाला सहज हरवले असते मी" (आता बोला)

रविवार 22 ऑगस्ट 2010
विसरभोळे सर्व आम्ही:
आमच्या खानदान मध्ये बरेच जन विसर भोळे या सदरात मोडतात. आणि असे बरेच विसर भोळे कधी एकत्र जमलेना मग मात्र धमाल गोष्टी घडतात, मजा येते. नातेवाईकांची मनोरंजनाची सोय होऊन जाते. बर्याच वर्ष पूर्वी कॉलेज मध्ये असताना एकदा असेच मी व माझा चुलत भाऊ "अता" एके ठिकाणी "दावत" मध्ये जेवायला गेले होतो. तिथे पार्किंग ची सोय अर्थातच नव्हती. मग काय गल्ली बोळात शेजार्या पाजार्या च्या अंगणात जिथं मोकळी जागा दिसेल तिथ गाड्या लावल्या जातात. आणि अश्यावेळेस बिचारे गल्लीतील शेजारीही निमुटपणे हे सर्व सहन करून घेतात कारण उद्या त्यांच्या हि घरी कार्यक्रम निघेल ...म्हणून. मीही अश्याच एकाच्या घरासमोर गाडी पार्क केली आणि लवकर लवकर गाडी स्टँडला लावून पटकन हंँडल लॉक लावून. घरातून कुणी डोकावण्याचा आत मी व "अता" तिथून निसटलो. पद्धतशीरपणे बिर्याणी झोडपून व गाठी भेटीचे सोपस्कार पार पडून आम्ही निघालो.
तिथे आमचे एक चाचा सुद्धा आलेले होते. आणि जेवण करून झाल्यावर बाहेर पडून ते एका सायकल जवळ परेशान उभे होते. त्यांनी आम्हाला आवाज दिला आणि सांगितले "अरे मेरी सायकल का लॉक खोलना जरा". आम्ही त्यांच्या कडून चावी घेतली उघडायचा प्रयत्न करू लागलो. बराच वेळ आमच्याने हि नाही उघडत आहे हे पाहून ते म्हणाले "अब बहोत कोशिश करली, एक काम करो, तोड दो लॉक मै नया डाल लुंगा". आम्हाला आयडिया पटली. मग आम्ही लॉक तोडायच्या मागे लागलो अता हत्यार आणायचे कोठून, इकडे तिकडे शोध घेतला एक लोखंडी रॉड दिसला दगड आणि रॉड च्या मदतीने आम्ही सायकल शी झटत होतो काका शेजारी उभे होते. तेवढ्यात एक लहान मुलगा आला आमच्या जवळ आणि अगदी शांत स्वरात विचारले "तुम क्या कर रहे हो?" मी त्याला खडसावले "तू बाजू हट जा, बीच बीच मी मत आ" तो बिचारा मागे सरकला आणि शांतपने बघत उभाराहीला. एव्हाना आम्ही दोघे दमून गेलो होतो. वैतागून आम्ही त्याच्या लॉक वर मोठ मोठी दगडा घालायला सुरवात केली. तो मुलगा तसाच शांतपणे पाहत उभाराहीला. अता मात्र मी जाम वैतागलो होतो तो लॉक काही करून आमच्याशी उघडायला म्हणजेच तुटायला तयार नव्हता. येणारे जाणारे आमच्या सर्कस कडे बघत होते.
अता काय करावे. कोणी ओळखीचं तिथे नव्हतं नाही तर एखाद्या "मुन्ना" किंवा "छोटू" ला सांगितला असतं "इतना काम कर देना यार". शेवटी चाचा म्हणाले "अरे इतने धुप मे क्यू खडे हो उधर छाव मे लेलो " म्हणून आम्ही दोघांनी एकेक चाक हातात धरला आणि उचलून सावलीत न्ह्यायला लागलो तेवढ्यात तो मुलगा म्हणा ला "मेरी सायकल कहा लेजारहे हो?" असे म्हणताच आम्ही त्याच्या कडे बघू लागलो कि हि काय भानगड आहे? आमचे चाचा घाबरल्या तोंडाने सायकल नीट बघायला लागले. मग त्या मुलाकडे एक कटाक्ष टाकला आणि इकडे तिकडे बघायला लागले. मी आणि अता स्तब्ध झालो. हे काय चाललंय. मग अचानक ओरडले "अरे देखो, मेरी सायकल तो वो उधर है" म्हणता क्षणी आम्ही सायकल खाली ठेवली म्हणजे आदळलीच. आणि त्या मुलाकडे आजीबात न बघता मान अगदी विरुद्ध दिशेत वळवून चूप चाप चाचा च्या माघे निघालो. मागच्या दिशेने कोणता हि आवाज आला तर अजिबात वळून बघायचे नाही असा मनात पक्का इरादा करून निघालो. थोड्याच अंतरावर चाचाची खरी सायकल होती परंतु पहिल्या ठिकाण पासून ती आडोश्याला होती म्हणजे तिथून तो मुलगा आणि त्याची सायकल दिसत नव्हती. ती चावी "अता" च्या हातात होती तिथे जाऊन तो म्हणाला "अरे ये चावी तो अब तेढी होगई , अब तो इस लॉक का खुलना भी मुश्कील है" म्हणताच मी घाबरलो वाटले अता दुसरा खेळ सुरु झाला.
त्याने प्रयत्न करून करून शेवटी चावी माझ्या हातात दिली व म्हणाला "इसके पहले वो बच्चा अपने बाप को लेके आजाये भाग याहासे" मी म्हणालो अब चाचा को छोड भी नाही सकते, मग मी प्रयत्न करू लागलो बराचवेळ गेल्यावर चाचा ची ट्यूब पेटली आणि ते ओरडले "अरे वो छोडो इस सायकल कि असली चावी तो ये मेरे दुसरे खिसेमे है" म्हणत त्यांनी दुसर्या खिश्यातन एक चावी काढली. भानगड अशी झाली होती कि सुरवातीला त्यांनी त्यांच्या सायकलची खरी चावी काढून त्या मुलाची सायकल चा लॉक उघडण्याचा प्रयत्न केला होता, जेंव्हा तो नाही उघडला म्हणून त्यांनी त्याच्या कडे असलेली दुसरी चावी नंबर २ काढून प्रयत्न केला व जेंव्हा आम्ही त्यांना भेटलो तेंव्हा त्यांनी आम्हाला चावी नंबर २ दिली. आणि जेंव्हा त्यांची खरी सायकल भेटली तर आमच्या कडे असलेली चावी नंबर २ नि आम्ही उघडायचा प्रयत्न केला. त्या गडबडीत चाचा परत विसरून गेले कि त्यांनी खरी चावी नंबर १ त्यांच्या खिशात टाकून दिली आहे आणि आमच्या कडे असलेली चावी हि चावी नंबर २ आहे. अता मात्र आमच्या सहनशीलतेचा अंत झाला होता हसावे कि रडावे कळत नव्हते उन्हामुळे आम्ही घामात न्हावून निघालो होतो. मी लागलीच माझ्या गाडीकडे वळलो खिश्यातून चावी काढण्या आधी तीनदा डोळे चोळून गाडी बघून खात्री करून घेतली. मग चावी तीनदा पाहून घेतली मग गाडीला किक मारली तोपर्यंत "अता" ने चाचा च्या खर्या सायकल मध्ये चावी नंबर १ घालून लॉक उघडले होते. आम्ही तिन्ही मनसोक्त हसलो, चाचा म्हणाले "चाची को नाही बताना आज हमने क्या कारनामा अंजाम दिया है" मग मी त्या मुलाच्या गल्ली कडे अजिबात न बघता अक्सेलेटर सोडला.....

याची सदस्यता घ्या:
पोस्ट (Atom)