रविवार 22 ऑगस्ट 2010

विसरभोळे सर्व आम्ही:

               आमच्या खानदान मध्ये बरेच जन विसर भोळे या सदरात मोडतात. आणि असे बरेच विसर भोळे कधी एकत्र जमलेना मग मात्र धमाल गोष्टी घडतात, मजा येते. नातेवाईकांची मनोरंजनाची सोय होऊन जाते. बर्याच वर्ष पूर्वी कॉलेज मध्ये असताना एकदा असेच मी व माझा चुलत भाऊ "अता" एके ठिकाणी "दावत" मध्ये जेवायला गेले होतो. तिथे पार्किंग ची सोय अर्थातच नव्हती. मग काय गल्ली बोळात शेजार्या पाजार्या च्या अंगणात जिथं मोकळी जागा दिसेल तिथ गाड्या लावल्या जातात. आणि अश्यावेळेस बिचारे गल्लीतील शेजारीही निमुटपणे हे सर्व सहन करून घेतात कारण उद्या त्यांच्या हि घरी कार्यक्रम निघेल ...म्हणून. मीही अश्याच एकाच्या घरासमोर गाडी पार्क केली आणि लवकर लवकर गाडी स्टँडला लावून पटकन हंँडल लॉक लावून. घरातून कुणी डोकावण्याचा आत मी व "अता" तिथून निसटलो. पद्धतशीरपणे बिर्याणी झोडपून व गाठी भेटीचे सोपस्कार पार पडून आम्ही निघालो.

                   तिथे आमचे एक चाचा सुद्धा आलेले होते. आणि जेवण करून झाल्यावर बाहेर पडून ते एका सायकल जवळ परेशान उभे होते. त्यांनी आम्हाला आवाज दिला आणि सांगितले "अरे मेरी सायकल का लॉक खोलना जरा". आम्ही त्यांच्या कडून चावी घेतली उघडायचा प्रयत्न करू लागलो. बराच वेळ आमच्याने हि नाही उघडत आहे हे पाहून ते म्हणाले "अब बहोत कोशिश करली, एक काम करो, तोड दो लॉक मै नया डाल लुंगा". आम्हाला आयडिया पटली. मग आम्ही लॉक तोडायच्या मागे लागलो अता हत्यार आणायचे कोठून, इकडे तिकडे शोध घेतला एक लोखंडी रॉड दिसला दगड आणि रॉड च्या मदतीने आम्ही सायकल शी झटत होतो काका शेजारी उभे होते. तेवढ्यात एक लहान मुलगा आला आमच्या जवळ आणि अगदी शांत स्वरात विचारले "तुम क्या कर रहे हो?" मी त्याला खडसावले "तू बाजू हट जा, बीच बीच मी मत आ" तो बिचारा मागे सरकला आणि शांतपने बघत उभाराहीला. एव्हाना आम्ही दोघे दमून गेलो होतो. वैतागून आम्ही त्याच्या लॉक वर मोठ मोठी दगडा घालायला सुरवात केली. तो मुलगा तसाच शांतपणे पाहत उभाराहीला. अता मात्र मी जाम वैतागलो होतो तो लॉक काही करून आमच्याशी उघडायला म्हणजेच तुटायला तयार नव्हता. येणारे जाणारे आमच्या सर्कस कडे बघत होते.

                      अता काय करावे. कोणी ओळखीचं तिथे नव्हतं नाही तर एखाद्या "मुन्ना" किंवा "छोटू" ला सांगितला असतं "इतना काम कर देना यार". शेवटी चाचा म्हणाले "अरे इतने धुप मे क्यू खडे हो उधर छाव मे लेलो " म्हणून आम्ही दोघांनी एकेक चाक हातात धरला आणि उचलून सावलीत न्ह्यायला लागलो तेवढ्यात तो मुलगा म्हणा ला "मेरी सायकल कहा लेजारहे हो?" असे म्हणताच आम्ही त्याच्या कडे बघू लागलो कि हि काय भानगड आहे? आमचे चाचा घाबरल्या तोंडाने सायकल नीट बघायला लागले. मग त्या मुलाकडे एक कटाक्ष टाकला आणि इकडे तिकडे बघायला लागले. मी आणि अता स्तब्ध झालो. हे काय चाललंय. मग अचानक ओरडले "अरे देखो, मेरी सायकल तो वो उधर है" म्हणता क्षणी आम्ही सायकल खाली ठेवली म्हणजे आदळलीच. आणि त्या मुलाकडे आजीबात न बघता मान अगदी विरुद्ध दिशेत वळवून चूप चाप चाचा च्या माघे निघालो. मागच्या दिशेने कोणता हि आवाज आला तर अजिबात वळून बघायचे नाही असा मनात पक्का इरादा करून निघालो. थोड्याच अंतरावर चाचाची खरी सायकल होती परंतु पहिल्या ठिकाण पासून ती आडोश्याला होती म्हणजे तिथून तो मुलगा आणि त्याची सायकल दिसत नव्हती. ती चावी "अता" च्या हातात होती तिथे जाऊन तो म्हणाला "अरे ये चावी तो अब तेढी होगई , अब तो इस लॉक का खुलना भी मुश्कील है" म्हणताच मी घाबरलो वाटले अता दुसरा खेळ सुरु झाला.

                        त्याने प्रयत्न करून करून शेवटी चावी माझ्या हातात दिली व म्हणाला "इसके पहले वो बच्चा अपने बाप को लेके आजाये भाग याहासे" मी म्हणालो अब चाचा को छोड भी नाही सकते, मग मी प्रयत्न करू लागलो बराचवेळ गेल्यावर चाचा ची ट्यूब पेटली आणि ते ओरडले "अरे वो छोडो इस सायकल कि असली चावी तो ये मेरे दुसरे खिसेमे है" म्हणत त्यांनी दुसर्या खिश्यातन एक चावी काढली. भानगड अशी झाली होती कि सुरवातीला त्यांनी त्यांच्या सायकलची खरी चावी काढून त्या मुलाची सायकल चा लॉक उघडण्याचा प्रयत्न केला होता, जेंव्हा तो नाही उघडला म्हणून त्यांनी त्याच्या कडे असलेली दुसरी चावी नंबर २ काढून प्रयत्न केला व जेंव्हा आम्ही त्यांना भेटलो तेंव्हा त्यांनी आम्हाला चावी नंबर २ दिली. आणि जेंव्हा त्यांची खरी सायकल भेटली तर आमच्या कडे असलेली चावी नंबर २ नि आम्ही उघडायचा प्रयत्न केला. त्या गडबडीत चाचा परत विसरून गेले कि त्यांनी खरी चावी नंबर १ त्यांच्या खिशात टाकून दिली आहे आणि आमच्या कडे असलेली चावी हि चावी नंबर २ आहे. अता मात्र आमच्या सहनशीलतेचा अंत झाला होता हसावे कि रडावे कळत नव्हते उन्हामुळे आम्ही घामात न्हावून निघालो होतो. मी लागलीच माझ्या गाडीकडे वळलो खिश्यातून चावी काढण्या आधी तीनदा डोळे चोळून गाडी बघून खात्री करून घेतली. मग चावी तीनदा पाहून घेतली मग गाडीला किक मारली तोपर्यंत "अता" ने चाचा च्या खर्या सायकल मध्ये चावी नंबर १ घालून लॉक उघडले होते. आम्ही तिन्ही मनसोक्त हसलो, चाचा म्हणाले "चाची को नाही बताना आज हमने क्या कारनामा अंजाम दिया है" मग मी त्या मुलाच्या गल्ली कडे अजिबात न बघता अक्सेलेटर सोडला.....

जहीर सय्यद

2 टिप्पणी(ण्या):

faran म्हणाले...

kharokhar visarbhole pan changlech hahahahahahaaaaaa.................chabi cha number cha ghol hahaha adyaphi mala kalla nahi.............tar chachala kay kalanar,,,,,,

mynac म्हणाले...

जहीर भाई,
तुमच्या चाचाच्या विसरभोळेपणाची आता मात्र कमाल झाली. पण ते स्वाभाविकच आहे कारण एकदा कुलूप उघडत नाही म्हटल्यावर त्यांची नि तुमची सारासार विचारबुद्धी न चालणे अशा प्रसंगी स्वाभाविक आहे.आम्हा वाचणाऱ्यांची मात्र चांगली करमणूक झाली,तुमच्या ह्या चाचा मुळे नि बैलाला आव्हान देणाऱ्या त्या काका मुळे.असेच गमतीदार प्रसंग नक्की सांगत जा.धन्यवाद.